Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेश‘I Love You चंदा...’, पत्नीला प्रियकरासोबत जगता यावे म्हणून पतीने संपवलं जीवन;...

‘I Love You चंदा…’, पत्नीला प्रियकरासोबत जगता यावे म्हणून पतीने संपवलं जीवन; चिठ्ठी वाचून डोळे पाणावतील

‘I Love You चंदा…’, पत्नीला प्रियकरासोबत जगता यावे म्हणून पतीने संपवलं जीवन; चिठ्ठी वाचून डोळे पाणावतील

[ad_1]

Crime Story :  गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या अनेक घटना समोर येत आहे. कधी पती तर कधी पत्नीचं विवाहबाह्य संबंधातून अनेक वेळा गुन्हेगारीकडे हे प्रकरण जातं. बिहारमधील सुपौलमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला कळलं की, पत्नीचं विवाहबाह्य संबंध आहे. पतीला पत्नीचं हे प्रकरण कळल्यानंतर त्याने स्वत:चं आयुष्य संपवलं. पत्नीला आयुष्यभर तिच्या प्रियकरासह आनंदी राहता यावे म्हणून त्याने टोकाचं पाऊल उचलं. हे प्रकरण नगरपरिषद क्षेत्रातील लाटौना मिशन वॉर्ड-18 मधील आहे. बुधवारी इथे पोलिसांना तरुणाच्या आत्महत्येची माहिती मिळाली. मृत पुरुषाचं नाव कुमुद यादव असून त्याच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्याच्या पत्नीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे त्याने सांगितलंय. (I Love You Chanda Husband ends life so wife can live with lover extramarital affair letter will bring tears to your eyes)

मृत व्यक्तीची सुसाईट नोट वाचून पोलिसांचेही डोळे पाणावलेय. कुमुद दोन वर्षांपासून नगर परिषद परिसरातील वॉर्ड 18 मध्ये पत्नी चंदा यादवसोबत भाड्याच्या घरात राहत होता. बुधवारी दुपारी कुमुदचा त्याची पत्नी चंदासोबत कशावरून तरी वाद झाला. यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. चंदा ओरडताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मात्र उशीर झाला होता. 

लोकांनी मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही तिथे पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले की, कुमुदची पत्नी चंदा यादव ही मधेपुरा जिल्ह्यातील महेशुआ पंचायतीच्या रानीपट्टी येथील रहिवासी अरुण यादव यांची मुलगी आहे. कुमुदने 2019 मध्ये चंदासोबत प्रेमविवाह केला होता.

कुटुंबीयांनी सांगितले की, चंदा यादव यांचं यापूर्वीही दोनदा लग्न झालं होतं. दोघांनाही मुले नाहीत. कुमुदची आई तिच्या बालपणीच वारली. गावकऱ्यांनी सांगितलं की पती-पत्नीमध्ये भांडण कशावरून झाले हे त्यांना माहित नव्हतं.

पत्नीसमोर आत्महत्या करणाऱ्या कुमुदने सुसाईड नोटमध्ये पत्नी चंदा कुमारीशी संबंधित अनेक किस्से सांगितलंय. कुमुदने लिहिलं की, चंदा, मी तुला खूप प्रेम केले. मी आजही ते करतो आणि भविष्यातही करत राहीन. पण तुला एका मुलाने फसवले आहे. म्हणूनच तू माझ्यावर कंटाळली आहेस. मला माहित आहे की तू त्याच्याशिवाय राहू शकत नाहीस. म्हणून, मी तुला मुक्त केलं. तू त्याच्यासोबत आनंदी राहा. मला त्या मुलाशी काहीही अडचण नाही. मी फक्त आत्महत्या करत आहे. आय लव्ह यू चंदा. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments