Tuesday, August 25, 2026
Homeदेश-विदेश'ब्रिटीशांमुळे गंगा प्रदूषित, पाश्चिमात्यांनी भारतीयांना...'; योगी विधानसभेत कडाडले

‘ब्रिटीशांमुळे गंगा प्रदूषित, पाश्चिमात्यांनी भारतीयांना…’; योगी विधानसभेत कडाडले

‘ब्रिटीशांमुळे गंगा प्रदूषित, पाश्चिमात्यांनी भारतीयांना…’; योगी विधानसभेत कडाडले

[ad_1]

Yogi Adityanath Blames Britishers for Ganga Pollution: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ य़ांनी बुधवारी थेट ब्रिटीशांना लक्ष्य केलं. कानापूरमध्ये गंगा नदी प्रदुषित होण्यासाठी ब्रिटीश जबाबदार असून त्याची सत्ता असतानाच गंगेमध्ये घाण पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच पाश्चिमात्य लोकांना भारतीयांना ज्ञान देण्याऐवजी त्यांनी काय करुन ठेवलं आहे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल विचार केला पाहिजे असं आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या विधानसभेत म्हणाले.

थेट ब्रिटीशांना दिला दोष

“मात्र त्यांनी (ब्रिटीशांनी) जे दूषित केलं आहे (ती गंगा नदी) आपल्यासाठी पवित्र आहे. आजही लोक गंगेत स्थान करतात आणि ती नदी आपल्याला पवित्र करते,” असं योगी आपल्या भाषणात म्हणाले. प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान गंगा नदी दूषित झाली होती हा दावा खोडून काढताना योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डाने नियमितपणे त्रिवेणी संगमावरील पाण्याचे नमुने गोळा केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. हे सर्व नमुने निर्धारित मर्यादेनुसार सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं. “गंगेच्या प्रदुषणाबद्दल प्रश्न विचारला जातो. गंगा नदी उत्तर प्रदेशमध्ये बिजनौर ते बालिया असा एक हजार किलोमीटरचा प्रवास करते. यापैकी सर्वात महत्त्वाचं ठिकाण कानपूर आहे. मागील 125 वर्षांपासून 4 कोटी लीटर प्रदुषित पाणी सिसामौ येथे गंगा नदीत सोडण्यात आलं,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

मोदींचे आभार मानले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी ‘नामामि गंगे’सारख्या योजनेच्या माध्यमातून गंगेच्या स्वच्छतेसाठी काम केलं, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. आधीच्या सामाजवादी पार्टीच्या सरकारने केंद्र सरकारकडून नदी स्वच्छतेसाठी मिळालेला निधी नदी स्वच्छ करण्यासाठी वापरला नसल्याचंही योगी आदित्यनाथ म्हणाले. 

नदी स्वत:ची काळजी घेते

वैज्ञानिक संदर्भ देत योगी आदित्यनाथ यांनी वाहतं पाणी सतत स्वच्छ होत असतं असं सांगितलं. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अहवालामध्ये संगमावरील पाण्याच्या दर्जावर शंका उपस्थित करण्यात आल्याने योगी आदित्यनाथांनी या अवालावरच शंका उपस्थित केली. उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डाने या पाण्याचे नमुने घेतले होते. मात्र त्यामध्ये मर्यादित प्रमाणात विषाणू आढळून आल्याचं योगी म्हणाले. तसेच त्यांनी गंगा नदी नैसर्गिक नियमानुसार स्वत:ची काळजी घेते, असंही योगी म्हणाले.

जो जसा असतो तसं दिसतं

महाकुंभच्या नियोजनावरुन टीका करणाऱ्यांना योगी आदित्यनाथांनी सुनावलं आहे. भगवान श्रीकृष्णच्या विधानाचा संदर्भ देत जी व्यक्ती जशी असते तसं त्याला जग दिसतं असा टोला लगावला. नकारात्मक लोकांना गंगेबद्दल नकारात्मकच गोष्टी सुचणार. पण याच गंगेत महाकुंभमध्ये 66 कोटी लोकांनी स्नान केलं आहे, असंही योगी म्हणाले.

 

 

 

 

 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments