Tuesday, August 25, 2026
Homeदेश-विदेशसुपरफास्ट ट्रेनचे डबे लाल रंगाचेच का असतात? कारण कोणालाच ठाऊक नसेल

सुपरफास्ट ट्रेनचे डबे लाल रंगाचेच का असतात? कारण कोणालाच ठाऊक नसेल

सुपरफास्ट ट्रेनचे डबे लाल रंगाचेच का असतात? कारण कोणालाच ठाऊक नसेल

[ad_1]

Indian Railway Interesting Facts: भारतात ज्याप्रमाणं मुंबई लोकलला या शहराची लाईफलाईन म्हटलं जातं अगदी त्याचप्रमाणं देशातील संपूर्ण रेल्वेसेवेचंही जगभरातून कौतुक होतं. दर दिवशी याच रेल्वेच्या माध्यमातून लाखोंच्या नव्हे तर कोट्यवधींच्या संख्येनं प्रवासी प्रवास करताना दिसतात. अशा या देशात राजधानी, शताब्दी, वंदे भारत, सुपरफास्ट, मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन अशा विविध श्रेणीतील रेल्वेगाड्या धावतात. 

देशाच्या कानाकोपऱ्याला रेल्वे मार्गानं जोडणाऱ्या या रेल्वेगाड्या समाजातील प्रत्येक श्रेणीला त्यांच्या खिशाला परवडेल अशाच दरात प्रवासाची मुभा देतात. भारतीय रेल्वेअंतर्गत देशभरात धावणाऱ्या प्रत्येक गाडीला श्रेणीनुसार एक खास रंग दिला जातो. सुपरफास्ट ट्रेनपासून पॅसेंजर ट्रेनपर्यंत प्रत्येक रेल्वेगाडीचा वेगळा रंग हा सांकेतिक असून ही बाब फार कमी प्रवाशांना ठाऊक आहे. 

बहुतांश सुपरफास्ट ट्रेन या लाल रंगाच्याच असता. तर, पॅसेंजर ट्रेनना निळा रंग दिला जातो. यामागचं नेमकं कारण माहितीय? रेल्वेच्या लाल रंगाच्या कोचला LHB म्हणजेच लिंक हॉफमॅन बुश Linke-Hofmann-Busch असं म्हटलं जातं. सध्याच्या घडीला रेल्वेचे हे कोच पंजाबच्या कपूरथळा इथं तयार केले जातात असं सांगण्यात येतं. 

हे लाल कोच अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात येतात आणि इतर कोचच्या तुलनेत त्यांचं वजन कमी असतं. या कोचला डिस्क ब्रेकची सुविधा असून कमी वजनामुळं ते ताशी 200 किमी इतक्या वेगानं धावतात. राजधानी आणि शताब्दी ट्रेनमध्ये हे लाल रंगाचे कोच पाहायला मिळतात. असं म्हणतात की, अपघातादरम्यान LHB कोच एकमेकांवर जात नाहीत, ज्यामुळं जीवित हानीचा धोका कमी होतो. 

रेल्वेमध्ये कायमच प्रवाशांच्या हिताचा विचार करत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. कोचचा रंग आणि त्यांचं वर्गीकरण त्याच दृष्टीकोनातून करण्यात येतं. हा झाला एक मुद्दा, पण रेल्वेमध्ये आसनव्यवस्थेपासून ट्रेनचा वेग इथपर्यंत प्रत्येक गोष्ट ही काही समीकरणांना अनुसरूनच आखण्यात येते. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments