कल्याण, ८ फेब्रुवारी २०२५ – सामाजिक कार्य आणि लेणी अभ्यास क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सुरज रतन जगताप यांना “त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला. मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर नागरिक कल्याण ट्रस्ट, कळवा यांच्या वतीने रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त हा सन्मान देण्यात आला.
सूरज रतन जगताप हे लेणी चळवळीतील एक सक्रिय अभ्यासक असून, ऐतिहासिक लेणी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी त्याच्या सहकार्यानी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा गौरव केला. विशेषतः अर्जुन काटे यांनी या कार्याचा सन्मान करण्यासाठी पुढाकार घेतला.
पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सूरज रतन जगताप म्हणाले, “हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून, पुढील सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल. ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.”