Tuesday, August 18, 2026
Homeसातारासाखरवाडीत बुद्ध विहाराच्या जागेसाठी पायी लॉंगमार्च! शेकडो अनुयायांचा निर्धार

साखरवाडीत बुद्ध विहाराच्या जागेसाठी पायी लॉंगमार्च! शेकडो अनुयायांचा निर्धार

फलटण :- साखरवाडी येथे बुद्ध विहाराच्या जागेसाठी गेली अनेक दशके संघर्ष सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने जागा उपलब्ध करून देण्यास विलंब लावल्यामुळे, हा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. या संदर्भात साखरवाडी गावातून फलटण तहसील कार्यालयावर शेकडो अनुयायांचा पायी लॉंगमार्च आयोजित करण्यात आला आहे.

लॉंगमार्च तपशील:
दिनांक: १० फेब्रुवारी २०२५
वेळ: सकाळी ८ वाजता.                            सुरुवात: साखरवाडी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या सर्व अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, आपल्या हक्काच्या जागेसाठी संघर्ष करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या लॉंगमार्चच्या माध्यमातून आपली एकता आणि ताकद दाखवून, बुद्ध विहाराला हक्काची भव्य जागा मिळवण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

सर्व बहुजन समाज बांधव, कार्यकर्ते आणि विचारवंत यांनी या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा.

“जय भीम! एका मोठ्या परिवर्तनासाठी पाऊल उचलूया!”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments