बारामती: ज्यांनी घोटाळे केले, त्यांच्याविरोधात सत्ताधारी आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते पुरावे सादर करत असताना देखील #ED आणि #IT विभाग गप्प का बसतो? असा संतप्त सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
आमदार पवार यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आणि गोविंद मिल्कवर करण्यात आलेल्या छापेमारीवर फेसबुक पोस्टद्वारे तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “संजीवराजे यांनी विधानसभेला, लोकसभेला राष्ट्रवादीचे काम केले म्हणूनच ही धाडी होत आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
“स्वायत्त यंत्रणांनी तरी किमान अण्णा हजारे यांच्यासारखं निःपक्ष वागणं अपेक्षित आहे,” असेही पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
राजकीय दबावाचा आरोप:
पवार यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादळ निर्माण झाले आहे. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य करण्याचा आरोप त्यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे.
घडामोडींचे सत्र सुरूच:
गोविंद मिल्कवर धाड आणि संजीवराजे यांच्या घरावर झालेली कारवाई ही केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहे का? की त्यामागे इतर काही कारणे आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.