Wednesday, September 2, 2026
Homeसाताराआरोग्यासाठी भरड धान्यांचे महत्त्व!

आरोग्यासाठी भरड धान्यांचे महत्त्व!

फलटण :- फलटण येथे कृषी प्रदर्शनात भरड धान्यांचे फायदे उलगडले श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांनी आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 अंतर्गत चर्चासत्रात, कृषी विज्ञान केंद्र कालवडेच्या गृहविज्ञान विषयतज्ज्ञ डॉ. प्रियदर्शनी देशमुख यांनी शेतकऱ्यांना भरड धान्य म्हणजेच मिलेट्सच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत सखोल मार्गदर्शन केले.

डॉ. देशमुख यांनी सांगितले की, गहू व तांदळाच्या तुलनेत भरड धान्य आरोग्यासाठी पोषणमूल्यांनी समृद्ध आहे. त्यामुळे याला ‘श्रीअन्न’ म्हणून ओळखले जाते. ज्वारी, बाजरी, राळे, नाचणी, राजगिरा यांसारखी धान्ये मधुमेह व रक्तक्षय टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. रामदास कदम होते. चर्चासत्रात माजी विद्यार्थी व पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. प्रतिक भोसले यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, बदलत्या शेती पद्धती, तसेच दुष्काळातील प्रगतशील शेती यावर प्रकाश टाकला.

याप्रसंगी महाविद्यालयीन समितीचे व्हॉइस चेअरमन श्री. शरदराव रणवरे, प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, तसेच प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी दिक्षा चौगुले यांनी केले.

संपादकीय: प्रा. एन. एस. धालपे, डॉ. जी. बी. अडसूळ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments