Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : नव्या वर्षात उद्धव ठाकरेंना कोकणात बसणार जबर धक्का? बडा...

Uddhav Thackeray : नव्या वर्षात उद्धव ठाकरेंना कोकणात बसणार जबर धक्का? बडा नेता साथ सोडण्याच्या तयारीत

[ad_1]

Thackeray group major setback in konkan : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील अपयशाने मरगळ झटकून टाकत पक्षाला नवी उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रयत्नशील असतानाच आता उद्धव ठाकरेंना कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत कोकणचा बालेकिल्ला कोसळल्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचा आणखी एक बुरुज ढासळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसात राजन साळवी मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments