
बीडच्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना भाजप आमदार सुरेश धस यांनी रश्मिका मंधाना, सपना चौधरी आणि मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर भाष्य केलं. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. प्राजक्ता ताईंचा अतिश्य जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न आहे. असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं. आमदार सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर आता प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली असून धस यांनी सर्व महिलांचा अपमान केल्यानं आपली माफी मागावी, अशी मागणी केली.