Sunday, August 30, 2026
Homeसाताराकोयत्याने हल्ला, शिवीगाळ, आणि घर पाडल्याची घटना: दोघांवर गुन्हा दाखल

कोयत्याने हल्ला, शिवीगाळ, आणि घर पाडल्याची घटना: दोघांवर गुन्हा दाखल

फलटण – शेतातील पाईपलाईन आणि पाण्याच्या टाकीचे नुकसान केल्याच्या कारणावरून विचारणा करणाऱ्या महिलेला कोयत्याने हल्ला करून गंभीर स्वरूपाचा वाद उफाळल्याची घटना घडली आहे. फिर्यादी सुवर्णा अर्जुन ननावरे (वय ४८, रा. धुळदेव, २३ फाटा, ता. फलटण) यांच्या तक्रारीनुसार, २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी करत त्यांच्या घरावर हल्ला केला, तसेच घर पाडून आंब्याच्या झाडांचेही नुकसान केले.

तक्रारीत असेही नमूद आहे की, हल्ल्यावेळी फिर्यादीच्या लहान मुलालाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अर्जुन रामचंद्र ननावरे (वय ५२) आणि सूरज अर्जुन ननावरे (वय २७, दोन्ही रा. धुळदेव, २३ फाटा, ता. फलटण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा अधिक तपास म पो ना हेमा पवार करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments