फलटण: फलटण शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 6 मधील समस्या जाणून घेण्यासाठी आणि नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील शनिवार, 21 डिसेंबर 2024 रोजी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह पायी दौरा करणार आहेत.
दौऱ्याची वेळ व स्थळ:
दिवस: शनिवार, 21 डिसेंबर 2024
वेळ: दुपारी 1 ते सायंकाळी 6
भाग: प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 6
या दौऱ्यादरम्यान, माजी खासदार नाईक निंबाळकर, आमदार पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तसेच सर्व विभागांचे अधिकारी प्रभागातील समस्या तपासून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करतील.
फलटण शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि स्थानिक नागरिकांनी या दौऱ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दौऱ्याचा उद्देश नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे व शहर विकासाला गती देणे हा आहे.