
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा सध्या फिल्म इंडस्ट्रीपासून लांब असला तरी तो सतत सर्वांचे लक्ष वेधून घेतो. विवेक बॉलिवूडमध्ये दिसत नसला तरी त्याचा स्वत: चा बिझनेस सुरु केला आहे. आज तो एक यशस्वी बिझनेसमॅन म्हणून ओळखला जातो. सध्या सोशल मीडियावर विवेकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ३४०० कोटी रुपयांच्या बिझनेसविषयी सांगितले आहे. तसेच, विवेकने तो कधीही प्रवास करताना इकॉनॉमी क्लासने प्रवास करत असल्याचे सांगितले आहे. आता या मागे नेमकं कारण काय? चला जाणून घेऊया…