Friday, August 14, 2026
Homeसाताराफलटण येथे वंचित बहुजन आघाडीची EVM विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू !

फलटण येथे वंचित बहुजन आघाडीची EVM विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू !


फलटण : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत दिनांक ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर पर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत.त्याचाच भाग म्हणून फलटण या ठिकाणी ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सुरुवात करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा पूर्व विभागाचे अध्यक्ष भीमराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण या ठिकाणी EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली माण,खटाव,कोरेगाव आणि पारगाव खंडाळा या तालुक्यात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. या अभियानाला फलटण शहर व फलटण तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे अभियान सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा पूर्व उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, फुले,शाहू, आंबेडकर विद्वत महासभा तालुका अध्यक्ष आनंद निकाळजे,तालुका अध्यक्ष संदीप भाऊ काकडे, फलटण शहर अध्यक्ष उमेश कांबळे,महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष चित्राताई गायकवाड,जिल्हा महासचिव अरविंद आढाव यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून या अभियानाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments