Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रफेंगल चक्रीवादळाचा परिणाम: महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता, तापमान वाढणार

फेंगल चक्रीवादळाचा परिणाम: महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता, तापमान वाढणार

पुणे :- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाचा फटका तमिळनाडूसह दक्षिण भारतातील राज्यांना बसला असून आता त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागानुसार, पुढील तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे सध्या असलेली थंडी ओसरून तापमान वाढण्याची शक्यता आहे.

पावसाचा यलो अलर्ट

3 आणि 4 डिसेंबरदरम्यान तळ कोकणातील सिंधूदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे, सोलापूर, सांगली तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या भागांमध्येही हलक्या पावसाचा अंदाज आहे.

सिंधूदुर्ग व रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

चक्रीवादळाचा प्रभाव आणि बदलते हवामान

‘फेंगल’ चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारपट्टीला धडक दिल्यानंतर, पुद्दुचेरी, कुड्डालोर, आणि विल्लुपूरम् या भागांजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्याचा प्रभाव हळूहळू महाराष्ट्रात जाणवत असून, थंड वाऱ्यांच्या मार्गात अडथळा येऊन ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.

तापमानातील बदल

हवामान खात्याच्या अंदाजानुसार:

थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांना चक्रीवादळामुळे अटकाव झाल्याने दमटपणा वाढेल.

थंडी कमी होऊन तापमानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

सध्याच्या स्थितीत नागरिकांनी पावसासाठी तयार राहावे आणि हवामान बदलांची नोंद घेऊन खबरदारी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments