Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण कोरेगाव विधानसभा निवडणूक: प्रा. रमेश आढाव यांच्या विजयासाठी संविधान समर्थन समितीचा...

फलटण कोरेगाव विधानसभा निवडणूक: प्रा. रमेश आढाव यांच्या विजयासाठी संविधान समर्थन समितीचा निर्धार

फलटण : 255 फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार जोरदारपणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संविधान समर्थन समितीने प्रा. रमेश तुकाराम आढाव यांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी उराशी बांधून घेतले आहे. माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी विडणी येथे झालेल्या सभेत सांगितले की, “आपण विजयाच्या उंबरठ्यावर असून, सर्वांनी एकजुटीने प्रा. रमेश आढाव यांच्या पाठीमागे उभे राहायला हवे.”

अहिवळे यांनी स्पष्ट केले की, समितीने मागील काही महिन्यांपासून तालुक्यात जनसंपर्क सुरू केला होता. बौद्ध समाजासाठी प्रतिनिधित्वाची मागणी करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपासून ते शरद पवार, अजित पवार यांनाही यासंदर्भात भेट घेतली होती. परंतु, प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी नाकारल्यामुळे संविधान समर्थन समितीने अखेर स्वतःचा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आणि प्रा. रमेश आढाव यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले.

संविधान समर्थन समितीला प्रहार, स्वराज्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा मिळाल्यामुळे या लढाईत आणखी ताकद आली आहे. सभेत बोलताना अहिवळे म्हणाले की, “आपला विजय हा केवळ प्रा. रमेश आढाव यांचा नसून तो संपूर्ण समाजाचा विजय असेल.”

येत्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदारांनी संविधान समर्थन समितीच्या उमेदवारास विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि समाजासाठी आपले मत देऊन एकजुट दाखवावी, असा संदेश देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments