माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा संशयास्पद मृत्यू; पुण्यातील घरात आढळला मृतदेह

0
2
माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा संशयास्पद मृत्यू; पुण्यातील घरात आढळला मृतदेह


टीम इंडियाचा माजी जलदगती गोलंदाज तसेच अभिनेता सलील अंकोला याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंकोलाच्या आईचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पुण्यातील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. डेक्कन भागातील गल्ली क्रमांक १४ मधील घरात सलील अंकोलाच्या आई मृतावस्थेत आढळल्या. कामवाली बाई आल्यानंतर ही घटना समोर आली. माला अशोक अंकोला असं त्यांचं नाव असून त्या ७७  वर्षांच्या होत्या आणि त्या पुण्यात एकट्याच रहात असल्याची माहिती आहे. 



Source link