तुळजा लेणी अभ्यास दौरा: सम्यक सांस्कृतिक संघाच्या वतीने ऐतिहासिक वारशाचा अभ्यास

0
1
तुळजा लेणी अभ्यास दौरा: सम्यक सांस्कृतिक संघाच्या वतीने ऐतिहासिक वारशाचा अभ्यास


फलटणः सम्यक सांस्कृतिक संघाच्या माध्यमातून काल दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी बुधवारी गांधी जयंतीच्या सुट्टीचे औचित्य साधून जुन्नर तालुक्यातील महत्त्वपूर्ण “तुळजा लेणी” या प्राचीन लेणी समूहावर एक दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात मर्यादित सदस्यांचा सहभाग होता.
हा अभ्यास दौरा कार्ला लेणी अभ्यास दौर्‍यानंतर केवळ पंधरा दिवसांच्या आत आयोजित करण्यात आला, ज्यामुळे तुळजा लेणीच्या स्थापत्यकलेचा अभ्यास सखोलपणे करता आला. लेणी स्थापत्याचे महत्त्वपूर्ण टप्पे समजून घेणे ही अभ्यासाची गरज होती आणि यामुळे तुळजा लेणी अभ्यासणे अत्यावश्यक मानले जाते.

या अभ्यास दौऱ्याच्या यशस्वी आयोजनामध्ये मदत करणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले. दौऱ्यात सहभागी सदस्यांसाठी विविध उपासकांनी अन्न आणि चहाच्या व्यवस्थेची जबाबदारी घेतली. उपासक Ravi Kamble सर यांनी अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती, तर उपासक Surendra Salve यांनी जाताना चहा उपलब्ध करून दिला. उपासक सुमेध दाभारडे यांनी सर्वांना पेस्ट्रीजची व्यवस्था केली, तर उपासक जनार्दन येलवे यांनी परतीच्या प्रवासात चहाची व्यवस्था केली. त्यांच्या या उदार अंतःकरणाच्या धम्म दातृत्वाबद्दल सर्व सदस्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

या अभ्यास दौर्‍याने सहभागी सदस्यांना प्राचीन बौद्ध स्थापत्य व तुळजा लेणीतील अद्वितीय कला यांचा सखोल अभ्यास करण्याची संधी दिली.

सूरज रतन जगताप (लेणी अभ्यासक )