Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्रAkshay Shinde Funeral : अक्षय शिंदेवर अखेर अंत्यसंस्कार; कडेकोट पोलीस बंदोबस्तात उल्हासनगरातील...

Akshay Shinde Funeral : अक्षय शिंदेवर अखेर अंत्यसंस्कार; कडेकोट पोलीस बंदोबस्तात उल्हासनगरातील स्मशानभूमीत दफनविधी

[ad_1]

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्यावर एन्काउंटरनंतर ५ दिवसानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. बदलापूर, ठाणे, कळवा व अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गट व स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयाच्या आदेशानुसार उल्हासनगर  शांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अक्षय शिंदेला दफन करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे   शांतीनगर स्मशानभूमी परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. पोलीस बंदोबस्तात शिंदेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments