Wednesday, September 30, 2026
Homeसाताराफलटण तालुक्यात आरोग्य सुविधांसाठी कोट्यवधींची तरतूद; साखरवाडी आणि कुसूरमध्ये प्रकल्पांना मंजुरी

फलटण तालुक्यात आरोग्य सुविधांसाठी कोट्यवधींची तरतूद; साखरवाडी आणि कुसूरमध्ये प्रकल्पांना मंजुरी


फलटण :फलटण तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेच्या उन्नतीसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. साखरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी ३ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच, कुसूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही आरोग्य प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

या निधीमुळे तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होणार आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून, आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments