Sunday, September 20, 2026
Homeमनोरंजन'तंगलान': स्वाभिमान आणि संघर्षाची सशक्त गाथा

‘तंगलान’: स्वाभिमान आणि संघर्षाची सशक्त गाथा

पा. रंजीत दिग्दर्शित ‘तंगलान’ हा चित्रपट म्हणजे केवळ एक कथा नव्हे, तर शोषित आणि वंचित मूलनिवासी समाजाच्या संघर्षाची खणखणीत कहाणी आहे.                                                पुणेः    रंजीतने नेहमीच आपल्या सिनेमातून दुर्बल आणि शोषित वर्गांना आवाज दिला आहे. ‘तंगलान’ मधूनही तो एका सशक्त संघर्षाची, स्वाभिमानाची कथा ताकतीने मांडतो. सिनेमात बुद्ध मूर्तीचं दर्शन वेळोवेळी होतं, ज्याला सामाजिक न्याय आणि आत्मसन्मानाचे प्रतीक मानले आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान म्हणजे शांतपणे, पण ठामपणे अन्यायाला विरोध करत, समानतेसाठी संघर्ष करणं. त्यामुळे या सिनेमात बुद्ध मूर्ती फक्त धार्मिक प्रतिमा नसून, ती सामाजिक न्यायाची प्रेरणा आहे.

चित्रपटाचा नायक विक्रम साकारत असलेला ‘तंगलान’ हा योद्धा आपली जातीय ओळख जपण्यासाठी आणि हक्कांसाठी लढणारा आहे. त्याचे डायलॉग्स ही स्वाभिमान आणि न्यायाच्या लढाईची साक्ष देतात, जसे की “आपल्या माणसांच्या हक्कांसाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार” आणि “स्वाभिमान हीच आमची खरी ओळख आहे.” यामुळे त्याच्या पात्राला संघर्षाचा सशक्त प्रतीक बनवण्यात आले आहे.

सिनेमातल्या आरती या पात्राद्वारे संघर्षशील महिलांचा स्वाभिमान आणि त्यांची ताकद दाखवली गेली आहे. ती आपल्या समाजासाठी आणि हक्कांसाठी लढणाऱ्या इतर पात्रांसोबत उभी राहते आणि त्यांच्या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावते.

‘तंगलान’ हा केवळ ऐतिहासिक चित्रपट नसून, आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरही एक ठोस संदेश देतो.

हा चित्रपट स्वाभिमान, आत्मसन्मान, आणि सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्यांसाठी एक प्रेरणादायी कथा आहे.

के अभिजीत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments