Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र शासनाचा शाहिरी क्षेत्रातील 2024 चा प्रतिष्ठित पुरस्कार लोकशाहीर राजेंद्र कांबळे यांना...

महाराष्ट्र शासनाचा शाहिरी क्षेत्रातील 2024 चा प्रतिष्ठित पुरस्कार लोकशाहीर राजेंद्र कांबळे यांना प्रदान

फलटण: माळशिरस तालुक्यातील खुडूस गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम लोकशाहीर राजेंद्र कांबळे यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे 2024 चा शाहिरी क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भिम शाहीर आणि शिवशाहीर या भूमिकेतून सुरुवात करत त्यांनी आपल्या बुलंद आवाजाच्या जोरावर लोकशाहीर म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सामाजिक प्रबोधनाचे तळमळीने काम करणाऱ्या कांबळे यांचे कार्य महाराष्ट्रभर गाजले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने यंदाच्या वर्षातील सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा केली असून, या पुरस्कारांच्या यादीत शाहीर राजेंद्र कांबळे यांचे नाव झळकले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एकूण १२ पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. शाहीर कांबळे यांना मिळणारा हा पुरस्कार तीन लाख रुपये रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असा आहे.

सांस्कृतिक पुरस्कार वितरण समारंभ ४ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या समारंभास सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

राजेंद्र कांबळे यांना लहानपणापासूनच शाहिरीची आवड होती. त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या सोबत अनेक पोवाडे गायले आहेत. त्यांच्या शाहिरीतून सामाजिक संदेश देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

2024 सांस्कृतिक पुरस्कार विजेत्यांची यादी:

  1. नाटक: श्रीमती विशाखा सुभेदार
  2. उपशास्त्रीय संगीत: डॉ. विकास कशाळकर
  3. कंठसंगीत: श्री. सुदेश भोसले
  4. लोककला: श्री. अभिमन्यू धर्माजी सावदेकर
  5. शाहिरी: शाहीर राजेंद्र कांबळे
  6. नृत्य: श्रीमती सोनिया परचुरे
  7. चित्रपट: श्रीमती रोहिणी हटंगडी
  8. किर्तन/समाजप्रबोधन: श्री. संजयनाना धोंडगे
  9. वाद्यसंगीत: श्री. पांडुरंग मुखडे
  10. कलादान: श्री. नागेश सुर्वे (ऋषीराज)
  11. तमाशा: श्री. कैलास मारुती सावंत
  12. आदिवासी गिरीजन: श्री. शिवराम शंकर घुटे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments