Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रशिवाजी महाराज पुतळा कोसळण्याप्रकरणी मोठी कारवाई: शिल्पकार जयदीप आपटे अटकेत

शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याप्रकरणी मोठी कारवाई: शिल्पकार जयदीप आपटे अटकेत

पुणेः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याच्या घटनेनंतर या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

कल्याण पोलिसांनी जयदीप आपटेला अटक केली आहे. तो अंधाराचा फायदा घेत, पोलिसांना चुकवून, आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी कल्याणच्या घरी आला होता. मात्र पोलिसांनी याची खबर मिळवून त्याला अटक केली.

पुतळा कोसळल्याने या घटनेवर मोठा वादंग निर्माण झाला होता आणि प्रशासनावर चौकशीसाठी तातडीने कारवाई करण्याचा दबाव होता. आपटेच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी काही महत्त्वपूर्ण तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments