Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! संपत्तीच्या वादातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या, बहिणीसह पाच जणांना...

धक्कादायक! संपत्तीच्या वादातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या, बहिणीसह पाच जणांना अटक

, पुणे : नाना पेठ पुण्यातील नाना पेठ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी रात्री नऊ वाजता दहा ते बारा जणांनी गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या केली. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणात पोलिसांनी आंदेकर यांच्या बहिणी संजीवनी आंदेकरसह एकूण पाच जणांना अटक केली आहे.

वनराज आंदेकर आणि त्यांच्या बहिणीमध्ये संपत्तीच्या कारणावरून वाद चालू होते. विशेषतः नाना पेठेमधील एक दुकान गणेश कोमकर यांना दिले होते, परंतु महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत ते दुकान पाडण्यात आले. या आणि इतर घटनांमुळे कोमकर यांच्या मनात राग निर्माण झाला आणि त्यांनी वनराज आंदेकर यांच्या हत्येचा कट रचला.

रविवारी संध्याकाळी, आंदेकर यांच्या घरात कौटुंबिक कार्यक्रमानंतर ते आपल्या चुलत भावासह बाहेर उभे असताना, अचानक दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि कोयत्याने हल्ला चढवला. या प्रकरणात अटक झालेल्या पाच आरोपींपैकी दोन आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर उर्वरित आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली असून, त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments