Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रपैगंबर जयंती निमित्त नातेपुते मध्ये रक्तदान शिबिर संपन्न, सर्व धर्मिय युवकांचा शिबिरास...

पैगंबर जयंती निमित्त नातेपुते मध्ये रक्तदान शिबिर संपन्न, सर्व धर्मिय युवकांचा शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद.

नातेपुते : जगाला शांततेचा संदेश देणारे,इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद निमित्त नातेपुते शहरात शाही मस्जिद मुस्लिम समाजाच्या वतीने दिनांक ०१ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यंदाचा शहर स्तरावरील ईद ए मिलाद या कार्यक्रमाची जबाबदारी समाजातील युवक वर्गाकडे असल्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती जमातीच्या विश्वस्तांनी दिली रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान ही संकल्पना मनाशी बाळगून जेष्ठ, युवक तसेच महिला रक्तदात्यांनी सायंकाळी नातेपसायंकाळी सहा वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले > होते, यंदाचा शहर स्तरावरील ईद ए मिलाद या कार्यक्रमाची जबाबदारी समाजातील युवक वर्गाकडे असल्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती जमातीच्या विश्वस्तांनी दिली रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान ही संकल्पना मनाशी बाळगून जेष्ठ, युवक तसेच महिला रक्तदात्यांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५१२ जणांनी हजेरी लावत या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. सर्वधर्मिय समाज बांधवांनी सहभाग नोंदवत विविधतेत एकतेचा यावेळी संदेश दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजातील युवकांनी मोठे परिश्रम घेतले व यावेळी, शाही मस्जिद चे धर्मगुरू आलिम मेराज शम्सी सहाब (किब्ला) यांनी उपस्थित बहुसंख्य रक्तदात्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments