Tuesday, September 15, 2026
Homeब्लॉगबौध्दांच्या प्राचीन स्थापत्यांवर ही प्रतीके दिसून येतात

बौध्दांच्या प्राचीन स्थापत्यांवर ही प्रतीके दिसून येतात

प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या वर आपल्या मान्यता प्रतीके अंकित करणे हे जरी आज आपण इतरांच्याकडे पाहत असलो तरी त्याचे श्रेय/ मुळ मात्र बौध्दांकडे जाते , बौध्दांच्या प्राचीन स्थापत्यांवर ही प्रतीके दिसून येतात त्याचे पुरावे अनेक ठिकाणाहून आतापर्यंत सापडेले आहेत.
प्राचीन काळातील अतिशय लोकप्रिय झालेले हे शिल्प म्हणजे सिद्धार्थ गौतम यांच्या आई महामाया यांचे स्वप्न शिल्प, हे स्वप्न शिल्प प्राचीन काळात खूप प्रसिद्ध झाले होते ते इतर संप्रदायांनी देखील स्वीकारले होते.
जुन्नर मधील गिध विहार समूहातील मान मुकुड लेणी समूहा पैकी सर्वात प्राचीन अर्धवट राहीलेल्या बुध्द लेणीच्या ( भूत लेणी अपभ्रंश झालेले नाव ) चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर अत्यंत सुबक लयबद्ध प्रमाणबद्ध अर्धउठावातील माहामाया यांचे स्वप्न शिल्प उत्कीर्ण करण्यात आले.
माहामाया यांचे हे स्वप्न शिल्प आजही इतके ताजे आणि बोलके वाटते की कलाकार इथेच कुठेतरी बाजुला गेलाय तो पुन्हा कार्यान्वित होणार आहे थोडा अवधीसाठी “ब्रेक” घेतलाय , तो पुन्हा आपल्या शिल्प कोरण्याच्या कामात मग्न होणार आहे.
शतके उलटून गेली तरी हे शिल्प अतिशय सुंदर आहे जीर्ण अथवा भग्नावशेषात रूपांतरित झालेले नाही , दगडाचा पोत अतिशय उत्कृष्ट असल्याने हा शिल्प मुळ रंगात सुबकपणे दिसून येत आहे.

सूरज रतन जगताप

लेणी अभ्यासक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments