Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रGaneshotsav 2024: जीएसबी गणपतीला ४०० कोटींचे विमा संरक्षण, मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती...

Ganeshotsav 2024: जीएसबी गणपतीला ४०० कोटींचे विमा संरक्षण, मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून प्रसिद्ध

[ad_1]

Ganesh festival 2024: दरवर्षी गणेशोत्सव देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. येत्या ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपत्ती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाला काहीच दिवस शिल्लक राहिले असून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग संर्कलच्या जी.एस.बी. गणपती सेवा मंडळाने यावर्षी नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. जी.एस.बी. गणपती सेवा मंडळाने यावर्षी तब्बल ४०० कोटी रुपयांचा विमा काढला आहे. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त येत येतात. यामुळे मंडळात होणारी गर्दी आणि गणपती बाप्पाच्या अंगावरील दागिने या सगळ्यांचा विचार करून जी.एस.बी. गणपती सेवा मंडळाने विमा रक्कमेत वाढ केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments