Emergency Trailer: नफरत, नफरत, नफरत और मिला क्या है मुझे; कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’चा ट्रेलर प्रदर्शित

0
19
Emergency Trailer: नफरत, नफरत, नफरत और मिला क्या है मुझे; कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’चा ट्रेलर प्रदर्शित


काय आहे चित्रपटाचा ट्रेलर?

कंगना रणौतने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये दिग्गज कलाकार दिसत असून आणीबाणीची परिस्थिती दिसत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला कंगना रणौत पंतप्रधान कार्यालयाच्या आत एण्ट्री करताना दिसत आहे. त्यानंतर बॅकग्राऊंडला ‘सरकार असे निवडा जे तुमच्यासाठी कठोर आणि योग्य निर्णय घेऊ शकते, ज्यांच्याकडे ताकद आहे’ हा डायलॉग ऐकू येत आहे. त्यानंतर ट्रेलरमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांची व्यक्तिरेखाही दाखवण्यात आली आहे. तसेच शिमलाशी झालेल्या कराराची चर्चा सुरु असते. आणीबाणी घोषिक केल्यानंतर देशात एकंदरीत काय परिस्थिती निर्माण होते हे दाखवण्यात आले आहे. इंदिरा गांधी यांची भूमिका साकरणाऱ्या कंगनाच्या तोंडून, ‘नफरत, नफरत, नफरत और मिला क्या है मुझे इस देश से’ हा डायलॉग लक्ष वेधताना दिसतो.



Source link