Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेश८०० रुपयांची थकबाकी मागितली म्हणून मजुराला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं, मॅनेजरला अटक

८०० रुपयांची थकबाकी मागितली म्हणून मजुराला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं, मॅनेजरला अटक

[ad_1]

Bihar Manager Kills laborer: बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली. ८०० रुपयांची थकबाकी मागितल्याने एका मजुराची हत्या करण्यात आली. झंझारपूरच्या बेलाराही भागात ही घटना घडली. मायक्रोफायनान्स कंपनीच्या मॅनेजरने मजूर झोताई मंडल ( वय, ५१) यांना तीन मजली इमारतीच्या छतावरून खाली फेकल्याचा आरोप आहे. यात मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. झोताईंनी मॅनेजरकडे त्याच्या मेहनतीसाठी आणि हक्कासाठी ८०० रुपयांची मागणी केली होती. यामुळे संतापलेल्या मॅनेजरने छतावरून फेकून त्याची हत्या केली. हत्येनंतर झंझारपूर रुग्णालयात प्रचंड गर्दी जमली आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हाणी, अशीही मागणी केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments