Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: पोहता येत नसतानाही पाण्यात उतरला, तरुणाचा खाणीत बुडून मृत्यू; मुंबईतील गोरेगाव...

Mumbai: पोहता येत नसतानाही पाण्यात उतरला, तरुणाचा खाणीत बुडून मृत्यू; मुंबईतील गोरेगाव येथील घटना

Mumbai: पोहता येत नसतानाही पाण्यात उतरला, तरुणाचा खाणीत बुडून मृत्यू; मुंबईतील गोरेगाव येथील घटना

[ad_1]

साहिल अन्सारी (वय, १८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. साहिल हा गोरेगाव पूर्व येथील आदर्श नगर येथील रहिवासी होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास तो त्याच्या मित्रांसोबत दहिसर पूर्व येथील वैशाली नगर येथील एका खाणीत गेला. पोहता येत नसतानाही तो पाण्यात उतरला. परंतु, अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. यानंतर त्याच्या मित्रांनी १०० क्रमांकावर फोन करून याबाबत पोलिसांना माहिती दिली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास साहिल पाण्यात बुडाला. त्यानंतर तब्बल चार तासानंतर पावणे पाच वाजता त्याला पाण्यातून बाहेर काढले आणि त्याला त्वरीत जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी साहिलच्या वडिलांचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचा अपप्रचार नाकारला आणि कोणाविरुद्धही तक्रार दाखल केली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments