Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटणमध्ये एक जखमी ; पतंगाचा मांजा गळ्यास लागल्याने !

फलटणमध्ये एक जखमी ; पतंगाचा मांजा गळ्यास लागल्याने !

फलटण :चायनीज मांज्यावर किंवा दोरी घेऊन त्याला काच लावून तयार केला जात असलेल्या देशी मांज्यावर बंदी असताना देखील मांजा उडवण्याचा प्रमाण काही कमी होत नाही.

फलटण-लोणंद रोडवर रानडे पेट्रोलपंपासमोर ९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दिपक अर्जुन लांडगे (वय ३५, रा. सोनगाव, ता. फलटण) हे मोटारसायकलवरून जात असताना पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्यास अडकून कापल्याने त्यांच्या गळ्यास व नाकास जखम झाली आहे. याबाबतची फिर्याद लांडगे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी पतंग उडविणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments