CM Eknath Shinde Pune visit : ‘एकनाथ काका भिंत बांधून द्या’! चिमुकल्या अन्वितच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी दिला प्रतिसाद

0
20
CM Eknath Shinde Pune visit : ‘एकनाथ काका भिंत बांधून द्या’! चिमुकल्या अन्वितच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी दिला प्रतिसाद


‘एकनाथ काका….एकनाथ काका’ म्हणून तो त्यांना आवाज देत होता. मात्र, त्याचा आवाज त्यांच्या पर्यंत पोहोचत नव्हता. पण त्याच्या हातातील पोस्टरने मात्र, मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं ‘एकनाथ काका आम्हाला प्लिज भिंत बांधून द्या…’ म्हणून अन्वितच्या हातातील पोस्टरने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. हे पोस्टर पाहून त्यांनी अन्वित व त्याच्या बाबाला पुढे बोललं त्याचा हात हातामध्ये घेत तुमच्या सोसायटीत पाणी आलं होतं का? असं मुख्यमंत्र्यांनी विचारलं. त्यावर अन्वितनं सोसायटीत खुप पाणी आल्याचं सांगितलं. तुम्ही काही काही तरी करा, असं देखील अन्वितनं मुख्यमंत्र्यांना म्हणत त्यांना विनंती केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमचा प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन अन्वितला दिलं व पुढील नागरिकांशी बोलण्यास सुरूवात केली. त्यानंतर एकता नगरीतील नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्वितचा उल्लेख केला आणि येथील नागरिकांचे प्रश्न सोडवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.



Source link