कान्हेरी लेणीवर रविवारी पुन्हा आपल्या वारसा स्थळासंदर्भात जनजागृती ; सुरज जगताप

0
4
कान्हेरी लेणीवर रविवारी पुन्हा आपल्या वारसा स्थळासंदर्भात जनजागृती ; सुरज जगताप

फलटणःकन्हसेले महाराजा महाविहार” कान्हेरी लेणीवर आज रविवार दिनांक २८ जुलै रोजी आम्ही पुन्हा आपल्या वारसा स्थळासंदर्भात जनजागृतीपरच्या उपक्रमासाठी एकत्रित आलो होतो.
आजचा रविवार थोडा वेगळा होता , आजच्या रविवारच्या उपक्रमात नवीन तरूण जोडले गेले होते , अभ्यास दौरा जाहीर केला असता तर ही संख्या खुप मोठी असती पण उपक्रमासाठी जनजागृतीसाठी वेळ द्यावे लागेल म्हणून ही संख्या रोडावलेली आहे , पण मुंबईतील असल्याने एक जागृत उपासक म्हणून पावसाळ्यात लेणीवरील तरुणांकडून होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचेच होते ते आम्ही उचलेले आहे आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
खरंतर लेणीवर आमचा सर्वांचाच हा एक दिवसाचा उपोषण ठरतो, कारण दिवसभर माझ्या सोबतचे सहकारी न खाता सोबत करतात, लेणीवर होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी लेणीवर आलेल्या तरूणांना लेणीचे महत्व पटवून देण्यात वेळ जातो त्यामुळेच जेवण वैगरे राहून जातं, आजच्या दिवसात यश सिध्दार्थ बरोबर आणि एक यश जोडला गेला होता हे आमचे दुहेरी यश आहे , हा यश Yugant Katkhade सरांचा भाचा आहे , युगांत काथकडे सर आणि मी अनेक वेळा चळवळीतल्या कार्यक्रमात भेटलो पण लेणीवर ते पहिल्यांदाच माझ्या सोबत होते, माझ्या अभ्यास दौऱ्यातून नेहमीच उपस्थित राहणारे जितू तांबे सर देखील या वेळेस वेळात वेळ काढून आले होते ,काही नवीन मित्र डोंबिवलीतुन होते तर काही मुंबईतील होते.

लेणीवर पावसाळ्याच्या दिवसात गैरवर्तन रोखण्यासाठी आम्ही सुरू केलेल्या उपक्रमात एकचे दोन दोनाचे चार चाराचे आठ ते दहा असे अधिकचे हात आता एकत्रित येत आहेत… तुम्ही कधी येणार आहात लेणीवर ?

सूरज रतन जगताप

लेणी अभ्यासक