Friday, October 2, 2026
Homeमनोरंजनजुलैच्या पहिल्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी

जुलैच्या पहिल्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी

[ad_1]


जून महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक मोठे चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित झाले. आता जुलैच्या पहिल्या आठवड्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण बहुप्रतिक्षित ‘मिर्झापूर 3’ प्रदर्शित झाला आहे. अनेक दिवसांपासून चाहते सिरिजच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत होते.

गुड्डू भैया आणि कालिन भैया यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अखेर ती प्रतीक्षा संपली असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही मालिका प्रदर्शित झाली आहे. याशिवाय ‘गरुडन’ हा दाक्षिणात्य चित्रपट आणि अनेक वेब सिरीजही याच आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत.

मिर्झापूर ३

‘मिर्झापूर सीझन 3’ या यादीत अव्वल आहे. मिर्झापूरचा तिसरा सीझन ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर 5 जुलै रोजी प्रसारित झाला आहे. मागील दोन सीझननंतर प्रेक्षक तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली असून शुक्रवारपासून ही मालिका ओटीटीवर पाहता येणार आहे.

गरूडन

चित्रपटगृहांमध्ये जबरदस्त कमाई केल्यानंतर आता ‘गरुडन’ हा दाक्षिणात्य चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 3 जुलै रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. अवघ्या 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 50 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

मलयाली फ्रॉम इंडिया

मल्याळम कॉमेडी-ड्रामा चित्रपट ‘मल्याळी फ्रॉम इंडिया’ 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. दोन महिन्यांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 5 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लाइव्हवर प्रदर्शित होणार आहे.

रेड स्वॉन

कोरियन वेब सिरीज ‘रेड स्वॉन’ डिस्नी प्लस हॉटस्टारवर 3 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

स्पेस कॅडेट

एम्मा रॉबर्ट्सचा ‘स्पेस कॅडेट’ 4 जुलै रोजी प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.

ही वेंट दॅट वे

‘ही वेंट दॅट वे’ 5 जुलैला जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.

बॉब मार्ले: वन लव्ह

‘बॉब मार्ले: वन लव्ह’ हा अमेरिकन बायोग्राफिकल ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट दिवंगत गायक बॉब मार्ले यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर 3 जुलैपासून पाहू शकता.

गोयो: द बॉय जनरल

गोयो: द बॉय जनरल 5 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

बेव्हरली हिल्स कॉप: एक्सेल एफ

‘बेव्हरली हिल्स कॉप: एक्सेल एफ’ ३ जुलै रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


हेही वाचा

“BIGG BOSS” मराठी सर्वांना ”वेड” लावायला येतोय…


OTT वर सत्य घटनांवर आधारित के-ड्रामा पाहा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments