Friday, October 2, 2026
Homeब्लॉगपितळखोरा लेणीत एकुण ३७ स्तंभ होते त्या पैकी आता मूळ स्वरूपातील १२...

पितळखोरा लेणीत एकुण ३७ स्तंभ होते त्या पैकी आता मूळ स्वरूपातील १२ स्तंभ शिल्लक आहे.

फलटण :पितळखोरा लेणीत एकुण ३७ स्तंभ होते त्या पैकी आता मूळ स्वरूपातील १२ स्तंभ शिल्लक आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात हैद्राबादच्या निजामशाहीच्या बांधकाम खात्याने या पैकी भग्न स्तंभांची दुरूस्ती करून घेतली होती जे चौकोनी स्तंभ आज मुख्य चैत्यगृहात दिसतात ते निजामांच्या काळातील आहेत जे भग्न स्तंभाच्याच दगडातून तयार करण्यात आले आहेत, १८५३ मध्ये पहिल्यांदा ही लेणी इंग्रज अधिकारी जेम्स विल्सन यांनी उजेडात आणली तर जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस यांनी १८८० मधील The Cave Temple Of India या ग्रंथात विस्तृत माहिती उपलब्ध करून दिली त्या वेळी फक्त ९ लेण्यांचा शोध लागला होता.
१९५३ मध्ये ही लेणी संरक्षित स्मारक म्हणून घोषीत करण्यात आली त्या आधी म गो दिक्षीत सरांनी दोन चैत्य लेणी समुहाचा शोध लावला होता तर म न देशपांडे सरांनी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून १९५७/५८ च्या केलेल्या मातीच्या उपस्यातून मुख्य चैत्यगृहा समोरील प्रांगणात अनेक मौल्यवान पुरावअवशेष शोधून काढले, स्फटिकात तयार केलेले पाच स्तूपाच्या आकाराचे अस्ति करंडक एक स्फटिकात तयार केलेली रिंग संकरीन यक्षाची मूर्ती जी आज दिल्लीच्या वस्तू संग्रहालयात दिमाखात उभी आहे.
अजिंठा लेणीत जी भित्तीचित्रे आपल्याला पहायला मिळतात त्याच्या ही आधीची भित्तीचित्रे पितळखोरा लेणीच्या मुख चैत्यगृहाची शोभा वाढवत आहेत… सातमाळ पर्वत रांगेतील आद्य लेणी म्हणून गणली गेलेली अशी कला संपन्न पितळखोरा लेणी.

सूरज रतन जगताप

लेणी अभ्यासक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments