Friday, September 25, 2026
Homeसातारादुचाकी चालकाने पादचाऱ्यास पाठीमागून धडक दिली तर पुढून येणाऱ्या एका महिला दुचाकी...

दुचाकी चालकाने पादचाऱ्यास पाठीमागून धडक दिली तर पुढून येणाऱ्या एका महिला दुचाकी स्वारास समोरून धडक दिली

फलटण : विंचुर्णी रस्त्यावर गिरवी नाका परिसरात, बेफाम दुचाकी चालकाने पादचाऱ्यास पाठीमागून धडक दिली तर पुढून येणाऱ्या एका महिला दुचाकी स्वारास समोरून धडक दिली. या अपघातामध्ये पादचारी वृध्द ठार झाला असून, महिला वकील व स्वतः दुचाकी चालक देखील जखमी झाला आहे.

अमोल संतोष रणवरे वय २३ वर्षे राहणार जिंती ( विकास नगर फलटण), ता. फलटण असे गुन्हा दाखल झालेल्या संशयताचे नाव असून, नवीन कायदा भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 281, 125(A),427 व मोटार वाहन कायदा कलम 134 (A),134(B),184 प्रमाणे त्याच्या विरोधात फलटण शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेले माहितीनुसार, दिनांक १/७/२०२४ रोजी सायंकाळी ६.०० ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान गिरवी नाक्याजवळ फलटण – विंचुर्णी रोडवर, फलटण येथे अमोल संतोष रणवरे हा दुचाकीवरून विंचुर्णी रस्त्याने फलटण बाजूकडे येत असताना हयगयीने, निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेफाम गाडी चालवत, अनिरुद्ध जगन्नाथ देवसकर वय ६५ वर्ष, राहणार जुनी मंडई कसबा पेठ फलटण यांना पाठीमागून धडक देऊन त्यांच्या मरणास कारणीभूत झाला, तसेच अॅड. मयूरा मुकुंद देशपांडे यांच्या प्लेजर गाडी क्रमांक एम एच ११ ए एन ६९६८ हीस समोरून धडक देऊन त्यांच्या गंभीर दुखापतीस तसेच स्वतःचे गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दातीर हे करीत आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments