Sunday, August 30, 2026
Homeब्लॉगश्रीलंकेतील रिडी विहारातील हे भन्नाट भित्तीचित्र !

श्रीलंकेतील रिडी विहारातील हे भन्नाट भित्तीचित्र !

फलटणःश्रीलंकेतील रिडी विहारातील हे भन्नाट भित्तीचित्र !कँडीयन काळातील रिडी ( रिडी म्हणजे श्रीलंकेतील अर्थ चांदी असा होतो ) विहारातील हे भित्तीचित्र अफलातून आहे , रिडी विहार हे इ स पूर्व दुसऱ्या शतकातील असून अनेक शतकांच्या स्थित्यंतरातून गेल्याने अनेक शिल्प आणि भित्तीचित्रांनी परिपूर्ण आहे.
वरील भित्तीचित्र हे कँडीयन काळातील असून, कँडीयन काळाची सुरुवात इ स च्या पंधराव्या शतकापासून सुरू होऊन एकोणिसाव्या शतकापर्यंत आहे, या काळातील हे भित्तीचित्र अनोखे आहे.
प्रथमदर्शनी पाहता हे चित्र आपल्याला एका हत्तीचे दिसून येईल पण बारकाईने निरीक्षण केले की भित्तीचित्र हळू हळू उलगडून येतो, हत्तीचा आकार जो निर्माण करण्यात आला आहे तो संपूर्णपणे स्त्रियांनी एकमेकांमध्ये आपल्याला अशा प्रकारे गुंफून घेतले आहे की त्याचा आकार आपल्याला हत्तीचा आभास निर्माण करतो, खरंतर नऊ स्त्रियांनी आपल्याला हत्तीच्या आकारात बेमालूमपणे परावर्तित करून घेतले आहे.
“नवनारी कुंजराया” असे या भित्तीचित्राला संबोधित केले जाते ज्याच्यावर भारतातील दाक्षिणात्य चित्र शैलीचा प्रभाव आहे.

सूरज रतन जगताप

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments