Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशmillennium express news : रेल्वे प्रवासात मधला बर्थ कोसळून खालील प्रवाशाचा मृत्यू!...

millennium express news : रेल्वे प्रवासात मधला बर्थ कोसळून खालील प्रवाशाचा मृत्यू! रेल्वे प्रशासनानं झटकले हात

[ad_1]

अली खान सी.के. असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अली हे १६ जून रोजी त्यांच्या मित्रासोबत ट्रेन क्रमांक १२६४५ ‘एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मिलेनियम सुपरफास्ट एक्स्प्रेस’ने प्रवास करत होते. ते स्लीपर कोचच्या खालच्या बर्थवर झोपले होते. ते आग्रा येथे जात होते. दरम्यान, ही गाडी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातजात असताना अचानक वरच्या बर्थची साखळी सुटली आणि मधला बर्थ हा खाली कोसळला. या घटनेत अली यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मानेला जखम झाली होती. त्यांना सुरुवातीला रामागुंडम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, २४ जून रोजी उपचारादरम्यान अली यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments