Friday, October 2, 2026
Homeसाताराकोळकी येथील  हॉटेल कोल्हापूरी कट्टा समोर झालेल्या अपघातात एक ठार व दोनजण...

कोळकी येथील  हॉटेल कोल्हापूरी कट्टा समोर झालेल्या अपघातात एक ठार व दोनजण जखमी झाले

फलटण : कोल्हापूरी कट्टा कोळकी येथील हॉटेल समोर दुचाकींचा झालेल्या अपघातात एकजण ठार झाला असून दोनजण जखमी झाले असल्याची नोंद फलटण शहर पोलीस स्टेशन येथे झाली आहे .

या अपघातात श्रीकांत गणपत काळुखे (रा. ग्रामपंचायतीजवळ कोळकी, ता. फलटण) हे ठार झाले असून राजेंद्र किसन जगताप (वय ५५, मूळ रा. पुरन, ता. जुन्नर, जि. पुणे, सध्या रा.अक्षतनगर, कोळकी, ता. फलटण) व ओवी अजित मुळीक हे जखमी झाले आहेत.

या अपघाताची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. २५ जून २०२४ रोजी सकाळी ११.३५ वा. चे सुमारास राजेंद्र किसन जगताप हे टीव्हीएस ज्युपीटर स्कुटी (क्र.एमएच ११ बीआर ६२७२) वरून त्यांची नात ओवी हीस शाळेतून घरी फलटण ते दहिवडी रस्त्याने दहिवडीकडे जात असताना हॉटेल कोल्हापुरी कट्टाचेसमोर, कोळकी येथे पाठीमागून आलेल्या श्रीकांत गणपत काळुखे याने त्याच्या बजाज पल्सर मोटारसायकल (क्र. एमएच ११ सीए ८१५५) वरून भरधाव वेगाने येऊन स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात पल्सरचालक श्रीकांत काळुखे यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर स्कुटीवरील राजेंद्र जगताप व त्यांची नात ओवी मुळीव जखमी झाली आहे.

या अपघाताचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments