‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ थ्रिलर चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित, चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

0
22
‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ थ्रिलर चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित, चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!


‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाची निर्मिती फैरोज माजगांवकर यांनी केली असून, दिग्दर्शन रोहितराव नरसिंगे यांचे आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते अरुण कदम, संजय खापरे, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, चैताली चव्हाण आदि कलाकारांच्या भूमिका ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटात आहेत. या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. या वेळेस अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संगीत दिग्दर्शक ऍलेन के पी, फतवा फेम अभिनेता प्रतीक गौतम, चित्रपटातील दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे, कलाकार व अन्य मान्यवर उपस्थित होते. हा चित्रपट आज मुंबईसह महाराष्ट्रातील पुणे, पनवेल, रत्नागिरी, नाशिक, परभणी, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद या जिल्ह्यातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.



Source link