Friday, September 18, 2026
Homeक्रीडानीरज चोप्राला सुवर्णपदक; ‘फिनलँड’मधील भालाफेक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

नीरज चोप्राला सुवर्णपदक; ‘फिनलँड’मधील भालाफेक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

[ad_1]








तुरुकू : वृत्तसंस्था : भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली असून, फिनलैंड येथे झालेल्या भालाफेक स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक पटकावले आहे. दुखापतीमुळे काही काळ विश्रांती घेतलेल्या नीरजने दणक्यात पुनरागमन केले असून, त्याने ८५.९७ मी. भालाफेक केली.

फिनलँडमधील तुरुकू येथील पावो नर्मी स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या स्पर्धेत नीरजने सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या माध्यमातून नीरज पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करीत आहे. आठ स्पर्धकांच्या या स्पर्धेत नीरजने तिसऱ्या फेरीत केलेली कामगिरी त्याला सुवर्णपदक मिळवण्यात पुरेशी ठरली. नीरजला फिनलँडच्या टोनी केरणान आणि ऑलिव्हर हेलेंडर यांनी टक्कर दिली. टोनीने ८४.१९ मी. भालाफेक करून रौप्यपदक मिळवले. तर कांस्यपदक विजेत्या ऑलिव्हरने ८३.९६ मी. भालाफेक केली. नीरजने मंगळवारी केलेली कामगिरी ही त्याची सर्वोच्च कामगिरी नसून यापूर्वी झालेल्या दोहा येथील स्पर्धेत त्याने ८८ मीटरहून लांब भाला फेकला होता. परंतु, मंगळवारी त्याने ८५.९७ मी. भालाफेक करूनही त्याला सुवर्णपदक मिळाले.

या स्पर्धेत एकूण सहा फेऱ्यांपैकी पहिल्या फेरीत नीरजने ८३.६२ मी., तर दुसऱ्या फेरीत ८३.४५ मी. भालाफेक केली. ८५.९७ मी. ची भालाफेक त्याची सर्वोच्च ठरली. चौथ्या फेरीत ८२.२१ मी. भाला फेकला पाचव्या फेरीत त्याचा फाऊल झाला. तर सहाव्या फेरीत ८२.९७ इतकी भालाफेक केली. भारताच्या नीरज चोप्रा याला अद्याप ९० मीटर दूर भाला फेकता आलेला नाही. हा टप्पा ओलांडण्याचे लक्ष त्याने ठेवले आहे. परंतु, खांदा दुखीमुळे त्याला त्यात अडथळा येत आहे. जर्मनीच्या मॅक्स डेहनिंगने हॉल येथे झालेल्या स्पर्धेत ९०.२० मीटर भाला फेकून विक्रम नोंदवला होता. हा मॅक्सही फिनलँडमधील स्पर्धेत होता; पण त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

हेही वाचा : 

 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments