
आमंत्रण मिळाल्यावर पूनम ढिल्लन काय म्हणाली?
पूनम ढिल्लनने इन्स्टा बॉलिवूडला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “तिने खूप क्यूट आमंत्रण पाठवले आहे. मी तिला लहानपणापासून ओळखते. मी तिचा संपूर्ण प्रवास पाहिला आहे, म्हणून देव तिला भावी आयुष्यासाठी खूप आशीर्वाद देवो. ती खूप गोड आणि प्रेमळ मुलगी आहे. मी तिला भरभरून सुख मिळावे, अशा शुभेच्छा देईन.’ इतकंच नाही तर, पूनम ढिल्लनने सोनाक्षीचा होणारा नवरा झहीर इक्बाललाही मजेशीर अंदाजात इशारा दिला आहे. ‘झहीर, तिला खुश ठेव, लक्षात ठेवा, ती खूप गोड मुलगी आहे. तिचं हसू आपल्या सर्वांसाठी खूप मौल्यवान आहे.’







