Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशKuwait Fire | कुवेतमधील 'त्या' इमारतीचा मालक कोण आहे? ज्यामध्ये 41 भारतीयांचा...

Kuwait Fire | कुवेतमधील ‘त्या’ इमारतीचा मालक कोण आहे? ज्यामध्ये 41 भारतीयांचा झाला होरपळून मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

कुवेतमधील ‘त्या’ इमारतीचा मालक कोण आहे? ज्यामध्ये 41 भारतीयांचा झाला होरपळून मृत्यू

Kuwait Building fire : कुवेतमध्ये बांधकाम मजूर राहात असलेल्या इमारतीला लागलेल्या आगीत किमान ४९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ४२ भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. दुर्घटनेत किमान ५० जण जखमी झाले आहेत.

दक्षिण कुवेतमधील मंगाफ भागात परदेशी कामगारांच्या निवासस्थानाच्या बहुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत केरळमधील 11 लोकांसह 40 हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाला आणि 50 हून अधिक जण जखमी झाले. बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीनंतर राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी गुरुवारी कुवेतला भेट देत असल्याचे सांगितले. याच दरम्यान जी चर्चा होते ती म्हणजे, केरळचे प्रसिद्ध अब्जाधीश बिझनेस टायकून आणि कुवेतमध्ये भारतीय नागरिकांना राहणाऱ्या इमारतीचे मालक केजी अब्राहम यांच्याबद्दल लोक गुगल करत आहेत. विशेष म्हणजे कुवेतमधील स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे साडेचार वाजता मंगफ शहरातील लेबर कॅम्पच्या स्वयंपाकघरात अचानक आग लागली. आगीने वणव्याचे रूप धारण केले आणि वरच्या मजल्यापर्यंत वेगाने पसरले. ज्या लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारली. सीलबंद काचेच्या खिडक्यांमुळे अनेकांना बाहेर पडता आले नाही आणि ते तिथेच होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

कुवेतचे अंतर्गत मंत्री शेख फहाद अल-युसूफ अल-सबाह यांनी कुवेत पोलिसांना या दुर्घटनेची तीव्रता समजताच इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले होते. इमारतीच्या रक्षकांची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या मालकाला आणि इमारतीत राहणाऱ्या कामगारांना अटक करण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्याचवेळी कुवेतचे डेप्युटी पीएम फहाद युसूफ अल सबाह यांनीही घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपासाचे आदेश दिले आणि या घटनेसाठी जबाबदार असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, मग तो कोणीही असो.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments