
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘मुंज्या’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी पासूनच चर्चेत आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हॉरर कॉमेडी असलेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने चार दिवसात किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. तसेच विकेंडला चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.








