Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशPM Narendra Modi Cabinet | NDA सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्यांकडे कुठली...

PM Narendra Modi Cabinet | NDA सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्यांकडे कुठली जबाबदारी? पाहा यादी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

NDA सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्यांकडे कुठली जबाबदारी? पाहा यादी

NDA Government: एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. पाहा कोणत्या मंत्र्यांकडे कुठली जबाबदारी देण्यात आली आहे.

18 व्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या विजयानंतर भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यासह मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर मोदी पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान झाले. यानंतर 17व्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवून ते सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले.

1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून नेहरू हे भारताचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले आहेत. 27 मे 1964 रोजी त्यांचे निधन झाले आणि त्यावेळीही ते देशाचे पंतप्रधान होते. 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्यानंतर ते पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून निवडले गेले. यानंतर 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकीतही काँग्रेसचा विजय झाला आणि नेहरू पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळवता आलेले नाही. त्याला 240 जागा मिळाल्या आहेत. मात्र, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 293 जागांसह बहुमताचा आकडा पार केला. यानंतर नुकतीच एनडीएच्या बैठकीत मोदींची भाजप आणि एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments