Saturday, October 3, 2026
Homeसातारारणजितसिंह नाईक निंबाळकर हे केंद्रीय मंत्री म्हणून बघायला मिळाले असते

रणजितसिंह नाईक निंबाळकर हे केंद्रीय मंत्री म्हणून बघायला मिळाले असते

फलटणः माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे राज्यामध्ये टॉप 10 खासदारांच्या मध्ये काम करण्याऱ्या खासदार म्हणून  छबी तयार झाली होती. केंद्रामध्ये व राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या सोबत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अगदी सलोख्याचे संबंध तयार केले आहेत. त्यामुळे जर माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून गेले असते तर नक्कीच ते केंद्रीय मंत्री झाले असते.

माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून अर्थात भारतीय जनता पार्टीच्या वतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर हे रिंगणात होते. माढा लोकसभा मतदारसंघात विरोधकांच्या एकजुटीमुळे व राज्यात असणाऱ्या भाजपा विरोधी लाटेने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. जर आज रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार म्हणून विराजमान झाले असते तर नक्कीच आज मोदी 3.0 मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर हे केंद्रीय मंत्री म्हणून बघायला मिळाले असते असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments