
Pune Rain : पुण्यातील पर्वती, डेक्कन, पाषाण तसेच अन्य भागात जोरदार पावसाने या भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वीर बाजी पासलकर पुल पाण्याखाली गेला आहे. पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू असून, कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने काही ठिकाणी पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.







