[ad_1]
नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा उद्या पार पडणार आहे. अखेर अजित पवार गटाचे मंत्रीपदाचे उमेदवार ठरले असून प्रफुल्ल पटेल यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून उद्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. लोकसभेच्या निकालामध्ये भाजपला बहुमत मिळाले नसले तरी एनडीएच्या घटक पक्षांच्या साथीने सरकार स्थापन केले जाणार आहे. राज्यामध्ये अजित पवार गट व एकनाथ शिंदे गट यांनी देखील महायुतीमध्ये सहभाग घेतला होता. एनडीएच्या संसदीय बैठकीला देखील अजित पवार व एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यामुळे या दोन्ही गटाला केंद्रीय मंत्रीपद मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर अजित पवार गटाचे मंत्रीपदाचे उमेदवार ठरले असून प्रफुल्ल पटेल यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रात अजित पवारांची ‘पॉवर’
[ad_2]
Source link


