NDA Meeting Delhi | नरेंद्र मोदी झाले संविधानसमोर नतमस्तक; एनडीएच्या बैठकीमध्ये मोदी – मोदी जयघोष | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
NDA Meeting Delhi | नरेंद्र मोदी झाले संविधानसमोर नतमस्तक; एनडीएच्या बैठकीमध्ये मोदी – मोदी जयघोष | Navarashtra (नवराष्ट्र)


नरेंद्र मोदी झाले संविधानसमोर नतमस्तक; एनडीएच्या बैठकीमध्ये मोदी – मोदी जयघोष

एनडीएच्या दिल्लीच्या भवनामधील बैठकीला चंद्रबाबू नायडू आणि नीतीश कुमार देखील उपस्थित आहेत. यावेळी नरेंद्र मोदी हे संविधानासमोर नतमस्तक झाले आहेत.

दिल्ली : देशामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसले तरी देखील एनडीए आघाडीच्या बळावर पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी हे येत्या 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी एनडीए आघाडीची संसदेमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. जुन्या संसदेमध्ये बोलावण्यात आलेल्या या बैठकीला एनडीए आघाडीच्या सर्व घटनपक्षांनी उपस्थिती लावली आहे. तसेच चंद्रबाबू नायडू आणि नीतीश कुमार देखील उपस्थित आहेत. यावेळी नरेंद्र मोदी हे संविधानासमोर नतमस्तक झाले आहेत.

एनडीएच्या या बैठकीला नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व घटकपक्षांचे जेष्ठ नेते उपस्थित आहेत. देशभरातील सर्व विजयी खासदार बैठकीला आले असून यामुळे संसदभवन गजबजले आहे. या बैठकीसाठी मंचावर नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, चंद्रबाबू नायडू आणि नीतीश कुमार उपस्थित आहेत. यावेळी चंद्रबाबू नायडू यांनी मोदींच्या नेतृत्वाला मान्यता दिली असून मोदींच्या नेतृत्वात देश अव्वलस्थानी आहे. तसेच सबका साथ सबका विकास होणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.





Source link