Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशBJP President | लोकसभा निवडणूक संपताच आता भाजप अध्यक्षाच्या बदलाच्या हालचाली; 'हे'...

BJP President | लोकसभा निवडणूक संपताच आता भाजप अध्यक्षाच्या बदलाच्या हालचाली; ‘हे’ नाव आघाडीवर… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

लोकसभा निवडणूक संपताच आता भाजप अध्यक्षाच्या बदलाच्या हालचाली; ‘हे’ नाव आघाडीवर…

भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने या दोन्ही नेत्यांना दिल्ली गाठण्याचा संदेश दिला आहे. शिवराज सिंह चौहान यांचेही नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येत आहे. पक्षाध्यक्ष झाल्यास ते स्वतः पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर होतील, असे मानले जात आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक संपली आहे. त्यानंतर आता भाजपचे पुढील अध्यक्ष म्हणून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. चौहान यांच्याशिवाय हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे.

भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने या दोन्ही नेत्यांना दिल्ली गाठण्याचा संदेश दिला आहे. शिवराज सिंह चौहान यांचेही नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येत आहे. पक्षाध्यक्ष झाल्यास ते स्वतः पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर होतील, असे मानले जात आहे. मात्र, या महिन्याच्या अखेरीस पक्षाध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाईल, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. त्यावेळी काही अनपेक्षित नावही दिसू शकते. तोपर्यंत कोणाच्याही नावांची अटकळच राहील.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments