Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रBaramati lok sabha : "बच्चा बडा हो गया"! सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित...

Baramati lok sabha : “बच्चा बडा हो गया”! सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांचा अजित पवारांना खोचक टोला, म्हणाले…

[ad_1]

बारामतीत सुनेत्रा पवार १ लाखांच्या फरकाने पराभूत

बारामती मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. सुप्रिया सुळे यांनी एक लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला. अजित पवारांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून बारामतीमध्ये तळ ठोकला होता. अनेक सभा घेत जनतेला साद घातली होती. भावनिक होऊन जाऊ नका, कोणाचं ऐकू नका, माझंच ऐका अशी वक्तव्ये केली होती. बारामतीकर त्यांना साथ देतील असा विश्वासही अजित पवारांना होता. मात्र निकालावरून स्पष्ट झालं की, बारामतीकरांचा जिव्हाळा थोरल्या साहेबांबरोबरच आहे. अजित पवारांची बंडखोरी त्यांना महागात पडल्याचे या बारामती लोकसभेच्या निकालावरून दिसून आले आहे. बारामतीत सर्वत्र जल्लोषचे वातावरण आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून गुलालाची उधळण करत, साहेबांचा नावाने घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला गेला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments